अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने प्रियदर्शनी मंगल कार्यालय, कामलाराजे चौक येथे गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद २०२५ अनुषंगाने सोमवारी दुपारी 1 वाजता शांतता कमिटी, गणेश मंडळ पदाधिकारी, पोलीस पाटील व डीजे-डॉल्बी धारक यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे, जातीय वा धार्मिक तणाव टाळणे, “नो डीजे – नो डॉल्बी” संकल्पना राबवणे, पारंपरिक वाद्यांचा वापर व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.