जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गरीब रुग्णांची अक्षरशः लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उबाठा पक्षाने केला आहे. 'विजू' नावाचा एक व्यक्ती राजकीय वरदहस्तामुळे रुग्णांना दाखल करण्याच्या नावाखाली पैशांची मागणी करत असून, यातील काही रक्कम डॉक्टरांनाही दिली जात असल्याचा खळबळजनक दावा पक्षाचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी बुधवारी २५ जून रोजी दुपारी १२ वाजता दिला आहे.