वेळू (ता. भोर) गावात अज्ञात व्यक्तींनी पुन्हा एकदा मोठी झाडे तोडून टाकल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून, झाडे तोडणाऱ्या विकृत व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.