आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवण्याचा निर्धार भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे. हॉटेल महाराजा येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी आज शनिवार 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. काय म्हणले धोंडू चिंदरकर पाहूया..