अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. पावसामुळे गावातील खड्डे आणि इतर ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने गप्पी मासे सोडून प्रभावी उपाययोजना केली.गप्पी मासे डासांची अळी खातात आणि त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. यामुळे गावातील नागरिकांना डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळणार आहे. पाणी शुद्ध राहावे आणि ग्रामस्थांचे आरोग्य सुर