जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. २०२५/२६ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हाभरातील १७ शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली असल्याची माहिती, आज गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे.