जळगाव शहरातील साने गुरुजी कॉलनी परिसरात राहणारी २६ वर्षीय तरुणी ही शनिवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेपासून घरात काहीही न सांगता बेपत्ता झाली. या संदर्भात रात्री ८ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. मोनिका नेहमीचंद जांगिड वय 26 रा. साने गुरुजी कॉलनी जळगाव असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे.