मत चोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब आणणार असल्याचं कौतुक संजय राऊत करत आहेत, पण राहुल गांधींचे आतापर्यंतचे सर्व राजकीय प्रयोग फसले आहेत. ज्यांना लोकांनी पुन्हा पुन्हा नाकारलं, अशा नेत्यांची स्तुती करणं म्हणजे जनतेचा अपमान आहे, असं बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. काँग्रेससोबत हातमिळवणी करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची काय अवस्था झाली, हे महाराष्ट्राने पाहिलं आहे, असंही ते म्हणाले.