गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रखर बीम लाईट व लेझर बीम लाईट याचा वापर केल्यास त्याचा भाविकांच्या डोळ्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने पिंंपरी चिंचवड पोलिसांनी त्याचा वापर करण्यास बंदी घातली होती. असे असताना गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाईटचा वापर करणार्या एकूण ४० गणेश मंडळावर भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.