आदरणीय संजय भाऊ राठोड यांनी व्याघ्रांगी महालक्ष्मी संस्थान, देऊळगाव वळसा येथील प्रसिद्ध श्री. महालक्ष्मी देवीच्या मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांसोबत आरती केली. तसेच यावेळी नागरिकांनी पालकमंत्री संजय राठोड यांचा भव्य नागरी सत्कार केला.नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, “समोर उभा असलेला हा जनसमुदाय मला नवी ऊर्जा आणि बळ देतो. आपण दाखवलेले प्रेम व विश्वास असाच कायम ठेवावा. तुमच्या सहकार्याने जिल्ह्यातील अनेक समस्या मार्गी लावून सेवा-सुविधांची निर्मिती केली जाईल...