पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत सुरू असलेल्या अभय योजनेला पनवेलकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला असून आतापर्यंत 500 कोटींपेक्षा अधिक रकमेचा विक्रमी मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. अभय योजनेचा लाभ घेत नागरिकांनी एकूण 100 कोटींपेक्षा जास्त रकमेची शास्तीमाफी मिळवली आहे. अशी माहिती महापालिकेने आज रविवारी दुपारी ४ च्या सुमारास आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली.