केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा, या मागणीसाठी निमगूळ ग्रामपंचायतीसमोर एकत्र येत संतप्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टकार्ड पाठवून लक्ष वेधले.