विरार येथील रमाबाई अपार्टमेंटचा काही भाव कोसळून भीषण अशी दुर्घटना घडली. इमारतीच्या ढिगाराखाली अडकलेला नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य राबवण्यात आले. 36 तासानंतर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 26 जणांना बाहेर काढण्यात आले त्यापैकी 17 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.