गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा आणि लोकमान्य सण आहे. या उत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस विभाग सतर्क झाला आहे. गडचिरोली पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ३० गुन्हेगारांना गणेश विसर्जन मिरवणूक कालावधीत हद्दपार केले जाणार आहे. तसा प्रस्ताव गडचिरोली पोलिस स्टेशनतर्फे अप्पर पोलिस अधीक्षकांकडे सादर केला जाणार आहे.