नंदुरबार शहरातील जळका बाजार परिसरातील हॉटेल पायल मध्ये 20 ऑगस्ट च्या रात्री सव्वा अकरा ते 21 ऑगस्ट च्या सकाळी नऊ वाजेच्या दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी दारूची चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 21 ऑगस्ट रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.