खेडलेझुंगे कोळगाव, खेडले झुंगे, देवगाव, वाकद शिरवाडे, कानळद आदी परिसरांतील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून प्रचंड संकटात सापडले आहेत. गावांकडे जाण्यासाठी आणि गावात ना व्यवस्थित रस्ते, नाही नाल्यांची सफाई. परिणामी वाढीव पावसाचे गळती लागलेल्या कालव्यांचे पाणी शेतांमध्ये साचून दरवर्षी पिके सहून जातात. यंदा तर रब्बीचा पीकपेरा पूर्णतः पाण्याखाली गेला असून, खरीप हंगामही त्याच पाण्याखाली गुदमरला आहे