गेल्या काही दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे.यवतमाळ जिल्ह्यातील चार तालुक्यातील 29 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून 7739 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर इसापूर अधरपुस, अडाण व निम्न वर्धा प्रकल्प,अरूनावती प्रकल्पातून विसर्ग केला जात आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून विविध ठिकाणी घराची पडझड झाली आहे.