समृद्धी महामार्गावर सोमवारी पहाटे मुंबईहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा १ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. चॅनेल क्रमांक २७३ जवळ अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.या अपघातात हरियाणातील बिच्चार भवन, रामनगर येथील हनीफ जहाण (वय ३७) या कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर कंटेनरचा पुढील भाग चुराडा झाला.