धाराशिव जिल्ह्यातील विजोरा येथील दत्ताराम विक्रम सावंत यांनी हलाखीच्या परिस्थितीत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत आयोजित सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्य पात्रता परीक्षा (SET) रसायनशास्त्र विषयात १४४ गुणांसह उत्तीर्ण झाले. त्याचबरोबर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे घेण्यात आलेल्या प्राध्यापक पदासाठीच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) देखील रसायनशास्त्र विषयात ऑल इंडिया रँक ३८ मिळवत उत्तीर्ण झाले आहेत.