साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्जप्रकरणांची लॉटरी (ईश्वर चिठ्ठी) पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १० ऑक्टोबर २०२५ रोजी, दुपारी १२.०० वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.