सोलापुरातील पूनम गेट येथे उद्धव ठाकरे गटाने महायुती सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले." भ्रष्ट मंत्र्यांना पायउतार करा" असे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "या सरकारला आम्ही स्वस्थ बसू देणार नाही" असा इशारा सोमवारी दुपारी 2 वाजता शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी देत जनतेच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.