10 जुलैला दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार वर्धा रोडला लागून असलेल्या बनवाडी ते अशोक वन या मार्गावर सहारा सिटीच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. प्रत्यक्ष दर्शनी या बिबट्याला रोडवर चालताना पाहिले आहे त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या रस्त्यावरून दररोज शेकरू नागरिकांची वर्दळ असते विद्यार्थी शेतकरी नागरिक देखील याच रस्त्यावरून अवागमन करतात त्यामुळे त्यांच्यात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.