पाथर्डी शहरातील आरोग्यमाता केंद्र आणि ज्योतीभवन या संस्था गरजू गोरगरिब वर्गा साठी परमेश्वरी शक्तीची अनुभूती देणारे केंद्र आहेत.गेले 25 वर्षात लाखो गरजुंनी येथील आरोग्य सेवांचा लाभ घेतला.शिक्षण केंद्राच्या माध्यमातून उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात येण्याचं भाग्यही लाभलं. हे दोन्ही केंद्र राज्याचे भूषण आहेत असं मत नाशिक धर्मप्रांताचे महागुरू स्वामी बारथोल बरेटो यांनी व्यक्त केले.