अकलुज येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून बचत गटाचे १० लाख रुपये काढल्यानंतर गट समन्वयक मनिषा रविंद्र गवळी (रा. यशवंतनगर, माळशिरस) यांच्याकडील पैशांची बॅग अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना दिनांक 29 ऑगस्ट रोजी घडली होती. या बॅगेत ८ लाख ७५ हजार रुपये रोख रक्कम तसेच १० हजार रुपयांचा मोबाईल फोन होता. दरम्यान या घटनेतील रक्कम मध्यप्रदेश येथून पोलिसांनी जप्तकेली असल्याची माहिती अकलूज पोलिसांनी आज गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता दिली आहे.