पिशोर येथील गणेश नावाच्या युवकाने पोलिस स्टेशनसमोर चेतावणीखोर व्हिडिओ तयार करून मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पिशोर पोलिस ठाण्यात निवेदन सादर केले. युवकाने व्हिडिओत वापरलेल्या अपशब्दांमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली.या नंतर सदरील युवकाने व्हिडिओ काढत माफी मागितली.