गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते श्री. अमोल दिगांबर करंबे यांचे द्वारे लिखित आणि दिग्दर्शित "अरण्य" या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. अरण्य हा चित्रपट एका माओवादी पात्राचे माओवादी चळवळीतील आयुष्य आणि आत्मसमर्पणानंतरचे आयुष्य या परिवर्तनाच्या कथेवर आधारित आहे.