स्थानिक खोलापुरी गेट पोलीस ठाणे हद्दीत पतीपासून वेगळी राहणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून विवाहाचे आमिष दाखवत सात महिन्यांपर्यंत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून दुराचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी वैभव सुनील अवजेकर (२७, रतनगंज) याला अटक केली आहे. तक्रारीनुसार, पीडितेचा विवाह २०२४ मध्ये झाला होता. मात्र, पतीचे मानसिकदृष्ट्या असामान्य वर्तनामुळे ती आईसोबत राहात होती व कॅटरिंगचे काम करीत होती. दरम्यान, जुलै २०२४ मध्