गडचिरोली शहरातील महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड येथे स्पंदन फाउंडेशन गडचिरोली यांच्या वतीने शिक्षक दिन समारंभ उत्साह पुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती होती.