बांभळीच्या झाडावर अनोख्या पद्धतीने गणेशाची प्रतिष्ठापना : पर्यावरणपूरक उपक्रमाची गावभर चर्चा अहिल्यानगर प्रतिनिधी – विसापूर गावातील तरुणांनी यंदा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आगळा वेगळा व पर्यावरणपूरक प्रयोग करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. घराघरात प्रतिष्ठापना न करता, शेतातील बांभळीच्या झाडावरच चक्क गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली.दरवर्षी होणारा खर्च, कृत्रिम सजावटीमुळे होणारे प्रदूषण आणि प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी हा अभिनव प्रयोग राबविण्यात आला.