जालना शहरात आणि औद्योगीक वसाहतीमध्ये निर्माण होणार्या प्रदुषणाची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवार दि. 8 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जालना शहर महानगरपालिकेत आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांना या संदर्भात माहिती दिली. प्रदुषणाचे प्रमाण किती आहे, त्यावर कंट्रोल कसा येणार? हवा प्रदुषण तपासणी यासह विविध प्रदुषणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली. 15 दिवसात 40 कंपन्यांच्या तपासणीतून करुन नियोजन करणार आहे.