उपद्रव माजवणाऱ्या वानरास वनविभागाने घेतले ताब्यात अंबड तालुक्यातील गोंदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून उपद्रव माजवणाऱ्या एका वानरास अखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले. या वानरामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. घरांच्या छतांवर बसून वस्तू फेकणे, झाडावर बसून जोरजोरात आवाज करणे, यामुळे लहान मुले, महिला यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सरपंच सोमनाथ गव्हाणे यांच्या तक्रारीनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पिंजरा लावून त्या