शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज रविवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात मत चोरीचा मुद्दा गेल्या ८ महिन्यांपासून आहे; आम्ही यावर प्रश्न उपस्थित करत आहोत. हा मुद्दा उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, काँग्रेस यांनी उपस्थित केला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अशा मत चोरीतूनच सत्तेत आले. आमची मते कुठे गेली, हा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला होता आणि आम्हीही विचारला होता. आता चोरीचा हा मुद्दा राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला आहे.