अतिवृष्टीने राणी अंकुलगा शेतकऱ्याचे मोठे नुकसान; सुनील गुराळे सरकारकडे मदतीची अपेक्षा . शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा येथील शेतकरी सुनील गुराळे यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अतिवृष्टीमुळे त्यांच्या दीड एकर शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हाताशी आलेले पिक वाहून गेल्यामुळे ते हताश झाले असून आता सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.