साकोली तालुक्यातील सानगडी जवळील साखरा येथील शेतशिवारात कोंबडा बाजार भरवून कोंबड्याच्या झुंजीवर जुगार अड्ड्यावर सानगडी पोलीस दुरुक्षेत्र हद्दीतील अधिकारीसअमलदार व साकोली पोलिसांनी धाड टाकून सात जणांवर गुन्हा दाखल करत1लाख63हजार520रुपयाचा मुद्देमाल सोमवार दि.25 ऑगस्ट दुपारी3वाजता जप्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक नूरल हसन यांच्या आदेशान्वये साकोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर हेड कॉन्स्टेबल दिनेश तिजारे सचिन कापगते मधुकर शेंडे आशिष हलमारे आशिष परचाके यांनी ही कारवाई केली