राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी 'आम्ही मटण खातो हे पांडुरंगाला आवडते' असे विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सोमवारी सकाळी १० वाजता राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवंडे यांना आव्हान दिले. कुलकर्णी यांनी विचारले की, 'पांडुरंगाला मटण खाल्लेतर आवडते ही राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका आहे का?' असल्यास त्यांनी जाहीर करावे, अन्यथा ५० हजार एक रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली.