जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास पथ संचलन करण्यात आले. आगामी गणेश उत्सव तसेच ईद ए मिलाद सणाच्या अनुषंगाने रेल्वे स्टेशन परीसरात दंगाकाबु योजना घेवुन जमाव पांगविण्याची तयारी करण्यात आली. दरम्यान शहरातील गांधीचमन, माळीपुरा, जामा मस्जीद, मोरंडी मोहल्ला, मरकज मस्जीद, हाकीम मोहल्ला, बागवान मस्जीद, मुजाहीद चौक, बाजार चौकी, आनंदी स्वामी गल्ली, ते शनिमंदीर या मार्गावरुन पोलीस पथ संचलन केलं.