पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कोपरगाव शहरात येऊन शहर व तालुका पोलीस ठाण्यात भेट दिली. आणि तेथील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीची आणि पोलीस वसाहतीच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याची दुरावस्था पाहिल्यानंतर त्यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीची पाहणी केली. तसेच लवकरच पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे आणि पोलीस वसाहतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार असल्याचे सांगितले.