धुळ्यात 28 सप्टेंबर रोजी रात्री आई एकवीरा मंदिराजवळील पुलावरून एका अज्ञात व्यक्तीने दुथडी भरून वाहणाऱ्या पांझरा नदीत उडी घेतल्याने खळबळ उडाली. मुसळधार पाऊस आणि अक्कलपाडा धरणातून 18 हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने नदी रौद्ररूपात आहे. घटनेनंतर देवपूर व आझाद नगर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली, मात्र अंधार व प्रचंड प्रवाह अडथळा ठरत आहे. व्यक्तीची ओळख व कारण अद्याप अस्पष्ट आहे.