हिंगोली राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्य कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे, मानधनात सरसकट वाढ करावी, कर्मचाऱ्यांचे लॉयल्टी बोनस लागू करावी या प्रमुख मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील 550 आरोग्य कर्मचाऱ्यांनी हिंगोली जिल्हा परिषदेसमोर काम बंद आंदोलन दिनांक 19 ऑगस्ट पासून सुरू केली आहे, जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील अशा इशारा आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.