पंढरपूर शहरातील टाकळी रोडवरील गजानन नगर येथे सज्जन कलाप्पा माने यांचे सलुनचे दुकान आहे. त्यांनी शहरातील चार खासगी सावकारांकडून व्याजाने पैसै घेतले होते. रक्कम व व्याज परत करूनदेखील सावकारांनी दमदाटी करत मोटारसायकल व मोबाईल घेऊन गेले. या खासगी सावकारांवर पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. यातील चौघांना जामीन मंजूर झाला असल्याची माहिती आज शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजता मिळाली आहे.