इंग्रजांच्या विरोधात लढ्यात भटके आणि विमुक्त जमाती अग्रस्थानी होत्या. त्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे इंग्रजांना या जमातींची भीती वाटत होती. त्यामुळेच या समाजावर गुन्हेगारीचा ठपका लावून त्यांना समाजापासून दूर ठेवण्यात आले. भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले, पण या समाजाला खरी मुक्ती मिळाली ती 31 ऑगस्ट 1952 रोजी, म्हणजे स्वातंत्र्यानंतर तब्बल पाच वर्षे सोळा दिवसांनी. आज राज्य सरकारने 31 ऑगस्ट हा भटका-विमुक्त दिन म्हणून घोषित केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे पडळकर यांनी आभार मानले