धारदार शस्त्राने वार करून एका युवकाचा अज्ञातांनी हत्या केल्याची घटना तालुक्यातील रायपूर गाव शिवारातील रायपूर सालईटोला मार्गावर मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा व दवनीवाडा पोलिसांनी उलघडा केला आहे कपूरचंद उर्फ बंटी हरिचंद ठाकरे व ओमकार चेतराम नेवारे दोन्ही राहणार रायपूर अशी बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत दोन्ही आरोपींना न्यायालयाने 11 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठाठावली आहे