साहूर हे आष्टी तालुक्यातील मोठे गाव... या गावातील बस स्थानकावर प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांची आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे जय महाराष्ट्र लोकशाही ग्रुप साहूर व नागरिकांनी आज दुपारी दोन वाजल्यापासून एकत्र येत ते चार च्या सुमारास प्रतिकात्मक प्रवासी निवारा उभारून गांधीवादी आंदोलन केले पंधरा दिवसात प्रवासी निवारा उभारला नाही तर भीक मागून आंदोलन करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हरले या प्रवासी निवाऱ्याचे उद्घाटन प्रसंगी यांनी स्पष्ट केले