श्रीगोंदा तालुक्यात पावसाने अक्षरशः हंगाम पुसला! कांदा सडला, शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त श्रीगोंदा तालुक्यात यंदाच्या पावसाने थैमान घालत शेतकऱ्यांच्या हातचा संपूर्ण हंगाम उद्ध्वस्त केला आहे. आधीच पडत्या भावामुळे खचलेले शेतकरी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कांद्याला भाव मिळेल या आशेवर साठवणूक करून बसले होते. मात्र मुसळधार पाऊस आणि सततच्या दमट हवेमुळे साठवलेला कांदा सडून खाक झाला. घाम गाळून उभे केलेले श्रम एका क्षणात पाण्यात मिसळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.