जिल्ह्यातील इंझोरी तालुका मनोरा सर्कलमध्ये दि. २९ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी पावसाने नदी, नाल्याला पूर येऊन काठावरील शेत जमीन खरडून जात शेतातील पिके पाण्याखाली आली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक मदत द्यावी, असे निवेदन तहसीलदार डॉ संतोष यावलीकर यांना दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पंचायत समितीचे माजी सदस्य मधुसूदन राठोड यांनी दिले आहे.