मागील 12 तासा पासून नाशिक शहर व परिसरात मुसळधार पावसाने थैमान घातले असून यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला असून दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आले आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू असून पूराचे पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.