वसई विरार महानगरपालिका क्षेत्र पाणीपुरवठा पुढील 24 तास बंद राहणार आहे त्याचप्रमाणे कमी दाबाने व अनियमित स्वरूपात पाणीपुरवठा होणार आहे. ढेकाळे येथे जलवाहिनी जोडणी, काशीद कोपर येथे जलवाहिनीवरील व्हॉल्व दुरुस्ती आणि शटडाऊन घेण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सूर्या टप्पा एक अंतर्गत होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत बंद त्याचप्रमाणे सूर्या टप्पा तीन व एमएमआरडीएमार्फत होणारा पाणीपुरवठा शुक्रवार सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत बंद राहणार आहे.