श्री चक्रधरस्वामी अवतारदिनानिमित्त दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान चक्रधर स्वामींची भव्य शोभायात्रा वाशिम शहरातून काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात होवून पाटणी चौक मार्गे, अकोला नाका येथे समारोप करण्यात आला. शोभायात्रेमध्ये रथ, ढोलताशा यासह विविध धार्मीक देखाव्यांचे प्रदर्शन करण्यात आले. सदर शोभायात्रेदरम्यान महिला व पुरुषांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला. सदर शोभायात्रेमध्ये धर्मगुरु, विविध पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.