पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी पत्रकार यांच्या वार्तांकनाबाबत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पुणे पोलीस आयुक्त यांनी पत्रकारांना वार्तांकन योग्य प्रकारे करता येईल तसेच पत्रकारांची सुरक्षा देखील राहील याची पुरेशी काळजी आगामी काळात घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळास त्यांनी दिले.