बार्शी तालुक्यातील धामणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे पत्रा शेडच्या आडोशाला पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी इम्पेरियल ब्लु कंपनीच्या बाटल्या, मॅकडॉल नंबर १ कंपनीच्या बाटल्या, देशी दारू टॅंगो पंच कंपनीच्या बाटल्या असा दारूसाठा जप्त केला. चोरून दारूची विक्री करणारा संजय ढवाळे याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.